Uncategorized
Trending

संकल्प क्रेडिट सौहार्द सहकारी नियामितच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व काही संचालकांविरुद्ध तक्रार

बेलगाम प्राईड/ संकल्प क्रेडिट सौहार्द सहकारी नियामित (पूर्वाश्रमीची संकल्प को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., नोंदणी क्र. DRL: RSR 30846/2002-03) या संस्थेच्या “अ” वर्गातील एका भागधारकाने संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही संचालकांविरुद्ध गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संबंधित प्राधिकरणाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, संस्थेचा मुख्य व्यवसाय कर्ज वितरण करणे आणि ग्राहकांकडून मुदत ठेवी (Fixed Deposits) स्वीकारणे हा आहे. संस्थेची डॉ. एस.पी.एम. रोड, बेळगाव येथे “संकल्प प्लाझा” या संकुलनात मालमत्ता आहे.

तक्रारदाराचा आरोप आहे की, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही संचालक यांनी मुदत ठेवीदारांना त्यांच्या मुदत ठेवीची रक्कम परत देणे बंद केले असून संस्थेची असलेली मालमत्ता बाजार दरापेक्षाही कमी किंमत दाखवून बेकायदेशीरपणे विक्री करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

हा व्यवहार झाल्यास संस्थेच्या मुदत ठेवीदारांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.याशिवाय, संस्थेची येथे असलेली मालमत्ता खरेदी करतानाही आर्थिक गैरव्यवहार व फसवणूक झाल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच कर्ज वितरण करताना कायदेशीर नियम व प्रक्रियांचे पालन करण्यात आले नसल्याचा आणि थकीत कर्जदारांविरुद्ध आवश्यक ती वसुलीची कारवाई करण्यात आलेली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अध्यक्ष उपाध्यक्ष व गैरव्यवहारात सहभागी असलेल्या संचालकांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदाराने जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी स्वरूपात करण्यात आली आहे. तसेच संस्थेवर तातडीने लिक्विडेटर नियुक्त करून थकीत कर्जांची वसुली करण्यात यावी आणि मुदत ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम त्वरित परत मिळण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!