राष्ट्रीय शोटोकॉन १५ व्या कराटे चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या ऐका कराटे स्पर्धकांचे घवघवीत यश

बेलगाम प्राईड/ राष्ट्रीय शोटोकॉन १५ वी कराटे चॅम्पियनशिप १७ ते १८ जानेवारी दरम्यान आनंद गुजरात येथे पार पडली. ही स्पर्धा निहोन शोटोकॉन कराटे असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत ऐका कराटे ॲकॅडमीच्या स्पर्धकांचे घवघवीत यश
स्पर्धेचे आयोजन हंशी कल्पेश खत्री, संचालक व मुख्य प्रशिक्षक, निहोन शोटोकॉन कराटे असोसिएशन जनरल सेक्रेटरी, NSKS जपान; तसेच उपाध्यक्ष, किओ इंडिया यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली करण्यात आले
या प्रतिष्ठित राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, केरळ, पश्चिम बंगाल, गुजरात, दमन, पाँडिचेरी तसेच देशाच्या विविध भागातील १,५०० हून अधिक कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्प, शिस्त आणि क्रीडावृत्तीचे दर्शन घडवले.
या स्पर्धेचे उद्घाटन क्योशी ताकेया नानाहोशी, अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक, निहोन शोटोकॉन कराटे दो शूगौकाल, जपान यांच्या हस्ते करण्यात आले.
कर्नाटक येथील ऐका कराटे चॅम्पियन्स अकॅडमीचे विद्यार्थी आपल्या कराटे मास्टर दीपक काकतीकर, राज्याध्यक्ष, NSKA कर्नाटक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत सहभागी झाले होते
ऐका कराटे चॅम्पियन्स अकॅडमीने उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ३१ पदके पटकावली यामध्ये ६ सुवर्ण पदके, ६ रौप्य पदके आणि १९ कांस्य पदके पटकावली आहेत प्रस्तुत स्पर्धेत नुपूर जोशी (वयः ५, वजनः १५) काटा सुवर्ण, कुमेत कास्म; शौर्य भोगले (वयः ९, वजनः २६) काटा रौष्म, कुमेत कास्म; नभाराजे वोडियार (वयः १० वजन २९) कुमेत द्वितीय,
अन वित कडादेवर (वयः ६ वजनः १९) काटा द्वितीय, कुमेत तृतीय, ध्रुव कुलकर्णी (वयः १३, वजनः ३२), – काटा तृतीय; धीमंत कुलकर्णी (वयः ११, वजनः २७) कुमेत तृतीय; , इरा पाटणेकर (वय: १०, वजनः ३२) काटा द्वितीय कुमेत तृतीय, अवंतिका कडादेवर (वय: ९, वजनः ३५) – कुमेत
तृतीय; समृद्धी द्यापी (वयः १२, वजनः ४९) कुमेत तृतीय; श्रेयस करळेकर (वयः १२, वजन ३६) काटा तृतीय, कुमेत तृतीय; स्कायला मेनेझेस (वयः १०, वजन २०) कुमेत सुवर्ण; प्रतीक निलाजकर (वयः १२, वजन २९) कुमेत कास्म; गुणसाथ्विक पोसा (वयः ११, वजन २४), काटा तृतीय; कुमेत द्वतीय, शुभम कोलासुंदकर (वयः ११, वजन २९)- कुमेत प्रथम; प्रत्युष रेडेकर (वयः १३, वजन ३०) काटा तृतीय कुमेत तृतीय; पलक कुन्ने (वय: १४, वजन ४८) कमेत तृतीय; मनीष कणगरळकर (वय१४ वजन ३६), काटा तृतीय कुमेत तृतीय; सुशांत कुरुबार (वय ९ वजन २२) काटा प्रथम, कुमेत प्रथम
नागेश पाटील (वयः १४, वजन ४३) कमेत तृतीय; आर्या काकतीकर (वयः १४, वजन ३५), काटा तृतीय कुमेत सुवर्ण अभीर पवार (वय १३ वजन ३४) कुमेत तृतीय काटा तृतीय तर दिनेश कुरुबर (वय १३ वजन २६) याने कुमेत स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविले. या शानदार यशामुळे अकॅडमीने चॅम्पियनशिपमध्ये उपविजेतेपद मिळवले आणि बेलगाव शहरासह कर्नाटक राज्य व ऐका कराटे चॅम्पियन्स अकॅडमीचे नाव लौकिक केले आहे.
या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आणि कराटे मास्टर दीपक काकतीकर यांनी स्पर्धेचे यशस्वी शिस्तबद्ध आणि उत्तम आयोजनाबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले विशेषतः हंशी कल्पेश खत्री यांच्या अथक परिश्रमांबद्दल समर्पित नेतृत्वाबद्दल आणि सततच्या प्रोत्साहनाबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले त्यांच्या मार्गदर्शनामुळेच खेळाडूंना प्रेरणा मिळाली आणि ही राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.
ऐका कराटे अकॅडमीचे मास्ट्र दीपक काकतीकर यांच्या मार्गदर्शनासह पालक पूजा पाटणेकर, रूपा कादाडेवर, दत्तात्रेय कुलकर्णी, योगेश जोशी, तुळसी गणूरे यांचे सहकार्य लाभले.




