
बेलगाम प्राईड/ बेळगांव कॅन्टोनमेंट बोर्डाने जीएलआर सर्व्हे क्र.१२९ (धोबी तलाव) येथील हॉकी स्टेडियमचा खेलो इंडिया योजनेअंतर्गत विकास करण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
या प्रस्तावित प्रकल्पामध्ये आधुनिक सिंथेटिक टर्फ, फ्लडलाइट्स, कार्यालयीन इमारतीचे बांधकाम तसेच प्रेक्षक गॅलरीची उभारणी यांचा समावेश आहे.
या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि खर्चाचा अंदाज तयार करण्यात येणार असून, तो अंतिम मंजुरीसाठी बोर्डाच्या पुढील बैठकीत सादर केला जाईल. त्यानंतर हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी संबंधित उच्च अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.




