Uncategorized
Trending

महिला विवस्त्र करून मारहाण प्रकरणातील 12 आरोपींना कठोर शिक्षा

बेलगाम प्राईड / देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगाव तालुक्यातील वंटमुरी येथे महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आलेल्या प्रकरणात 12 आरोपींना प्रत्येकी पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेळगाव येथील अतिरिक्त 10 वे जिल्हा व सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. बुधवारी सकाळी हा महत्वपूर्ण निकाल कोर्टाने दिला आहे.

या प्रकरणाची चर्चा देशपातळीवर झाली होती न्यायाधीश एच. एस. मंजुनाथ यांनी संबंधित कलमांखाली आरोपींना शिक्षा व दंड ठोठावून आदेश दिला आहे.

या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत :बसप्पा नाईक, राजू नाईक, केंपन्ना नाईक, पार्वती नाईक, यल्लव्वा नाईक, लक्कप्पा नाईक, गंगव्वा नाईक, संगीता हेग्गनाईक, संतोष नाईक, शोभा नाईक, लक्कव्वा नाईक आणि शिवप्पा वन्नुरी.

शिक्षा जाहीर होताच न्यायालयात उपस्थित आरोपी व त्यांच्या कुटुंबीय भावूक झाले होते.या वेळी सरकारी विशेष सरकारी वकील एल. एस. सुळ्ळद तसेच आरोपींच्या बाजूने वकील रविराज पाटील आणि शेख हे न्यायालयात अनुपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!