Uncategorized
Trending

 आबा क्लब पुरस्कृत दिव्यांग मुलांच्या जलतरण शिबिराची सांगता

बेलगाम प्राईड/ गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात संपन्न झालेल्या दिव्यांग असलेल्या मुलांसाठी तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत जलतरण शिबिराचे आबा स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजित करण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या या शिबिरामध्ये 50 मुला मुलीने भाग घेतला होता.हे शिबिर संपूर्ण आबा क्लब तसेच दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून  करण्यात आले 

या शिबिरामध्ये भाग घेतलेल्या सर्व जलतरणपटूंना भेटवस्तू तसेच आनंद केटरर्स यांच्याकडून अल्पोपहाराची सुविधा करण्यात आली होती. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक नितीन जाधव जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, आबा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष शितल हुलबते, डॉल्फिन ग्रुपचे महादेव केसरकर, विनायक अर्कसाली, याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते.

नगरसेवक नितीन जाधव यांनी आबा क्लबने हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल संतोष व्यक्त करून मुलांना पुढील प्रशिक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारावी अशी सूचना क्लबच्या सभासदांना तसेच जलतरण प्रशिक्षकांना केली. जायंट्स लक्ष्मण शिंदे यांनी पालकांना आपल्या मुलांना प्रोत्साहन देऊन मुलांच्याकडून सराव  करून घेण्यासाठी नियमितपणे जलतरण तलावावरती घेऊन जावे असे सुचविले.

यावेळी अंगविकल आंतरराष्ट्रीय जलतरण पटू मयंक हलदर राष्ट्रीय जलतरणपटू शुभम कांबळे होम जुळी आरोही, विशाल पवार यांचा गौरव करण्यात आला. या जलतरण शिबिराची संपूर्ण माहिती विश्वास पवार यांनी देऊन सगळ्यांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!