Uncategorized
Trending

बेळगावात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शिवजयंती मोठ्या उत्साहात जल्लोष साजरी 

बेलगाम प्राईड / परंपरेनुसार मध्यवर्तीय सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ बेळगावतर्फे शहापूर येथील छ. शिवाजी उद्यानामध्ये शिवरायांच्या मूर्तीचे पूजन व अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात भक्तीभावाने साजरी करण्यात आली.

श्री छत्रपती शिवजयंती निमित्त बेळगाव शहरातील विविध शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध गड किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतींचे धर्मवीर संभाजी चौक येथे मध्यवर्ती शिवजयंती मंडळाच्या वतीने हार घालून स्वागत करण्यात आले. यानंतर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे नरगुंदकर भावे चौक येथे मध्यवर्ती शिवजयंती मंडळाच्या वतीने शिवमुर्तीचे पूजन करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला

यानंतर शहापूर येथील छ. शिवाजी उद्यानायेथे शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी उद्यानातील शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीला मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून विधिवत पूजन करण्यात आले. रमाकांत कोंडुसकर, भाजप नेते किरण जाधव, महंतेश कवडगीमठ, आदी मान्यवरांनी मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन केले.

यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणांनी उपस्थित आणि उद्यान परिसर दणाणून सोडला होता. कार्यक्रमास माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, सरिता पाटील, नगरसेवक नेताजी जाधव, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, पोलीस उपायुक्त नारायण बरमनी, रमेश पावले, विकास कलघटगी सकल मराठाचे किरण जाधव,आदींसह मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळाचे पदाधिकारी, सकल मराठा समाजाचे सदस्य भाजप पदाधिकारी सदस्य, बालगोपाळ आणि बहुसंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांनी असभ्यवर्तन करू नये आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत या पद्धतीचे देखावे सादर करावेत, असे आवाहन कोंडुसकर यांनी केले. मिरवणुकी दरम्यान आपले समाज बांधव -भगिनी मोठ्या संख्येने रस्त्यावर असतात. त्यांची सुरक्षितता महत्वाची असल्यामुळे शिवभक्त या नात्याने प्रत्येकाने शिवरायांच्या आचार विचारांचे आचरण करणे कर्तव्याचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!