Uncategorized
Trending

शिवम असोसिएट्च्या शिवानंद निलंण्णावर यांच्यावर खाजगी तक्रार दाखल

बेलगाम प्राईड/ शिवबसवनगर बेळगाव येथील शिवम असोसिएट्सने हजारो कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अद्याप एकाही गुंतवणूकदाराने तक्रार दाखल केली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असताना आता नुकतीच पहिली खाजगी तक्रार दाखल झाली आहे.

शिवबसवनगर येथील शिवम असोसिएट्स या संस्थेवर गेल्या शनिवारी महसूल, सहकार आणि पोलीस विभागाने छापा टाकून केलेल्या संयुक्त कारवाईनंतर या संस्थेने तब्बल 4.5 हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक व्यवहार केल्याची माहिती उघडकीस आली होती. त्यानंतर सहकार खात्याच्या उपनिबंधकांच्या तक्रारीवरून शिवम असोसिएटचा चालक शिवानंद निलण्णावर याला अटक करण्यात आली यानंतर त्याला सखोल चौकशीसाठी सीआयडीच्या ताब्यातही देण्यात आले. मात्र दरम्यानच्या गेल्या तीन दिवसाच्या कालावधीत शिवम असोसिएटशी संबंधित हजारो गुंतवणूकदारांपैकी एकानेही तक्रार दाखल केली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत होते.

आरोपी शिवानंद यांचे वकील ॲड. मंजुनाथ जी. एल. यांनी देखील शिवम असोसिएट्स विरुद्ध आरबीआय व सेबीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. मात्र एकाही गुंतवणूकदारांनी याविरुद्ध तक्रार नोंदवले नाही. कारण या तथ्य नाही संस्थेचा व्यवहार पारदर्शक असल्याचे काल स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर आता शिवानंद निलण्णावर याच्या विरोधात पहिली खाजगी तक्रार दाखल झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील कागवाड पोलीस ठाण्यामध्ये कृष्णा आप्पांना अप्राज नामक व्यक्तीने ही तक्रार नोंदविली आहे. शिवानंद निलण्णावर याच्याकडे आपण 5 लाख रुपये गुंतवले होते. गुंतवलेल्या पैशावर शेकडा 36 टक्के व्याज आणि 5 लाखाची मुद्दल टप्प्याटप्प्याने एप्रिल महिन्यापर्यंत परत करण्याचे आमिष दाखवून आपल्याकडून पैसे गुंतवून घेण्यात आले असल्याचे कृष्णा यांनी कागवाड पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!