Uncategorized
Trending

येरगट्टी तालुक्यातील प्रशासकीय केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन

बेलगाम प्राईड/ बेळगाव जिल्ह्यातील येरगट्टी तालुक्यातील नागरिकांचे अनेक वर्षांचे स्वप्न असलेल्या “तालुका प्रशासकीय केंद्र (प्रजासौध) इमारतीच्या” बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी संपन्न झाले.

सार्वजनिक बांधकाम तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी उपस्थित होते. सुमारे ८.६० कोटी रुपये खर्चून ही सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे.

यावेळी तालुका पंचायत कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले. सौंदत्ती -यल्लम्मा मतदारसंघाचे आमदार विश्वास वसंत वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!