
बेलगाम प्राईड/ बेळगाव मध्ये नानावाडी येथील कमांडो विंग परिसरात स्विमिंग करत असताना एका सैन्य अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ज्युनियर लीडर्स कमांडो विंगमधील स्विमिंग पूल येथे घडली.
हरियाणाचे रहिवासी लेफ्टनंट अमितसिंह हे स्विमिंग करत असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. ते बेळगाव येथील एमएलआयआरसी कमांडो विंगमध्ये प्रशिक्षण घेत होते. अशी माहिती मिळाली
या दुर्दैवी घटनेनंतर त्यांना तात्काळ पाण्याबाहेर काढण्यात आले. लाईफगार्ड प्रदीप कुमार यांनी त्यांना प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर अँम्ब्युलन्स मधून त्यांना बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. असून टिळकवाडी पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून पुढील तपास करीत आहेत.




