Uncategorized
Trending

ज्येष्ठ नेते शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल

बेलगाम प्राईड/ मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, खबरदारीच्या उपाययोजना म्हणून त्यांच्यावर वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. त्यामुळे त्यांचा आजचा बारामती दौरा रद्द करण्यात आला आहे. याबाबत खास. सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना नियमित तपासणी आणि काही वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या विविध चाचण्या सुरू असून, अहवाल आल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!