Uncategorized
Trending

दिल्लीतील चोरट्याला अटक, 45 लाखांहून अधिक किमतीचे सोनं जप्त

बेलगाम प्राईड/ बेळगाव शहरातील शहापूर भागात घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीला शाहापूर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 45 लाख 56 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 42/2026 अंतर्गत बीएनएस 2023 च्या कलम 331(3), 331(4) आणि 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतनगर, शाहापूर येथील एका घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले होते.

 

या प्रकरणी पोलिसांनी मिंटू विश्वास ऊर्फ चिंटू, वय 52, रा. डी-284, बस्ती काला, तिलक नगर, पश्चिम दिल्ली याला अटक केली. आरोपीकडून 294.190 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे किंमत 44 लाख 86 हजार 390 रुपये तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली होंडा अ‍ॅक्टिव्हा दुचाकी, किंमत 70 हजार रुपये जप्त करण्यात आली. एकूण 45 लाख 56 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त, बेळगाव शहर तसेच उप-पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), उप-पोलीस आयुक्त (गुन्हे व प्रशासन) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मार्केट उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी, पीएसआय मणिकंठ पुजारी, पीएसआय प्रवीण बिरादार, पीएसआय मंजुनाथ भजन्त्री (सीसीबी) तसेच शंकर गुडदईगोल, श्रीधर तळवार, अजित शिपुरे, श्रीशैल गोकावी, शिवराज पच्चन्नवर, श्रीरंग भस्म, खादरसाब खानम्मन्नवर, लक्ष्मण कडोलकर, यासिर जमादार, फिंगरप्रिंट विभागाचे निरीक्षक आनंद मेत्री, तांत्रिक विभागातील रमेश अक्की व महादेव कासीद यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!