Uncategorized
Trending

विभागीय दसरा जलतरण स्पर्धेत तनुज सिंग व वेदा खानोलकर यांना चॅम्पियनशिप बेळगांव संघाला सर्वसाधारण विजेतेपद 

बेलगाम प्राईड/ युवजन सेवा व क्रीडा खात्याच्या वतीने गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आयोजित केलेल्या बेळगाव विभागीय दसरा जलतरण स्पर्धेत बेळगाव संघाने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले तसेच या स्पर्धेतील पुरुष विभागात तनुजसिंग तर महिला विभागात वेदा खानोलकर यांनी प्रत्येकी पाच पाच सुवर्णपदकासह वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवली. या स्पर्धेत बेळगांव सह धारवाड, विजयपूर, गदग, हावेरी, कारवार, बागलकोट जिल्ह्यातील जलतरणपटूणी भाग घेतला होता.

स्पर्धेतील विजयी स्पर्धकांची कामगिरी पुढील प्रमाणे 

पुरुष विभाग – कुमार तनुज सिंग पाच सुवर्ण, अमन सुनगार चार सुवर्ण एक रौप्य, आदी शिरसाठ दोन सुवर्ण दोन रौप्य, दर्शन वरूर एक सुवर्ण दोन रौप्य, चिन्मय बागेवाडी चार रौप्य, अर्णव किल्लेकर एक रौप्य, विनय कुमार गनियाल एक रौप्य, प्रज्वल हुल्लूर एक रौप्य.

महिला विभाग- वेदा खानोलकर पाच सुवर्ण, आरोही अवस्थी दोन सुवर्ण, साक्षी शिरळी दोन सुवर्ण, सायली घुगरेटकर एक सुवर्ण चार रौप्य, सृष्टी कंगराळकर एक सुवर्ण तीन रौप्य, शर्मिष्ठा मलाई एक सुवर्ण तीन रौप्य, स्वराली शिवनगेकर एक रौप्य, भूमी भागवत एक रौप्य.

वरील सर्व जलतरणपटूंची दिनांक 11 ते 14 ऑक्टोबर रोजी मैसूर येथे होणाऱ्या राज्य पातळीवर दसरा सी एम कप साठी अभिनंदन या निवड झाली आहे.

विजेत्या सर्व जलतरणपटूंना युवजन सेवा व क्रीडा खात्याचे डेप्युटी डायरेक्टर श्री श्रीनिवास यांच्या हस्ते पदक प्रशिक्षित पत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आबा हींद क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, रणजीत पाटील, विजय नाईक, प्रसाद दरवंदर, किशोर पाटील, ओम घाडी, मारुती घाडी भरत पाटील, विजय भोगन, कल्लाप्पा पाटील, अमित कुडची, शुभांगी मंगलोरकर, ज्योती पवार, विजया शिरसाठ, वैभव खानोलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!