Uncategorized

शहरात गांजाचे सेवन करणाऱ्या तिघेजण तर मटका घेणाऱ्या एकाला अटक

बेलगाम प्राईड / बेळगाव शहरातील महाद्वार रोड आणि समर्थनगर येथे सार्वजनिक ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करून वावरणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संतोष श्रीकांत लोहार (वय 34, रा. भारतनगर शहापूर), नवज्योत गुरुनमसिंग भाटिया (वय 34, रा. शास्त्रीनगर बेळगाव) सिद्धार्थ युवराज पाटील (वय 19, रा. समर्थनगर बेळगाव) अशी तिघांची नावे आहेत. या तिघांपैकी संतोष लोहार व नवज्योत भाटिया हे दोघे काल महाद्वार रोड येथील संभाजी उद्यान परिसरात सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वर्तन करत असल्याचे निदर्शनास येताच त्यांना मार्केट पोलीसानी घेतले उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडले. तसेच त्यांची चौकशी केली असता त्यांनी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन केले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे वैद्यकीय तपासणी करून संतोष व नवज्योत यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेमध्ये सिद्धार्थ पाटील हा समर्थनगर दुसरा क्रॉस येथे सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन केलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला. त्याला देखील पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला आहे. वरील दोन्ही गुन्हे मार्केट पोलीस ठाण्यात नोंद झाले आहेत.

मटका जुगाराचे आकडे घेणारा गजाआड

मच्छे औद्योगिक परिसरातील हनुमान मंदिराजवळ पैसे घेऊन मटका जुगाराचे आकडे घेणाऱ्या एकाला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी काल बुधवारी अटक करून त्याच्याकडील रोख 1740 रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव जॉन थॉमस कलघटगी (रा. जयनगर, हुंचानट्टी ता. जि. बेळगाव) असे आहे. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!