कित्येक वर्षात स्वच्छता न झालेल्या भागाचे काम नगरसेवक नितीन जाधव यांच्या कार्यकाळात झाले.

कित्येक वर्षात स्वच्छता न झालेल्या भागाचे काम नगरसेवक नितीन जाधव यांच्या कार्यकाळात झाले.
बेलगाम प्राईड/ आ.अभय पाटील जस नेहमी नाविन्य कामाचा उपक्रम राबवतात तसाच उपक्रम नगरसेवक नितीन जाधव यांनी टिळकवाडी परिसरात बुधवार पेठ येथे राबविण्यात आला आहे.
गेल्या साठ वर्षांपासून बुधवार पेठ कॉर्नर या ठिकाणी गवळी समाज शेण आणि इतर कचरा टाकत असतात नितीन जाधव यांनी येथील स्वच्छतेचा पुढाकार घेऊन गवळी समाज बरोबर चर्चा करून त्यांना पर्यायी व्यवस्था करून दिले आणि तेथे भिंती वर चित्रीकरण करून त्या भागातील नागरिकांना बसण्यासाठी नव्याने बेंचेस करण्यात आले आहेत. या कामा बद्दल बुधवार पेठ व टिळकवाडी मधील नागरिकांनी हा स्वच्छतेचा प्रकार पाहून समाधान व्यक्त केले तसेच नगरसेवक यांनी ही गवळी समाजाने सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही मना पासून आभार व्यक्त केले.
https://www.facebook.com/share/v/176Hjup8Jj/
या वेळी संतोष पाटील, दीपक हरदी,हर्षद कलघटगी, आनंद कबाडी, समीर गवळी, चेतन बेटगेकर, सुभाष भवानी, प्रमोद पोटे महानगर पालिकेचे अधिकारी . लक्ष्मण मोहिते, गजानन मुळीक या सह अन्य नागरीक उपस्थित होते….




