Uncategorized
Trending

विजापूर येथे मध्यरात्री गॅस सिलिंडर स्फोटात, सात दुकाने जळून खाक

बेलगाम प्राईड/ दुकानात असलेल्या सिलेंडरचा मध्यरात्री अचानक गळती लागू स्पोर्ट झाल्याने त्या भागातील चार दुकाने जळून आगी मध्ये जळून खाक झाली असल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री विजयपूर येथील येथे घडली.

अचानक उठलेल्या ठिणगीने किराणा दुकानातील सिलिंडरला आग लागली आणि त्यातून मोठा अग्नितांडव उभा राहिला. या आगीत टी-कॉफी, फूड स्टॉलसह अनेक दुकाने क्षणार्धात जळून खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पाण्याचे फवारणी करून आग विझवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली. सिलिंडर स्फोटाचे दृश्य मोबाइलमध्ये कैद झाले असून ते अतिशय भीषण होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनास्थळी एपीएमसी पोलिसांनी भेट देऊन तपास केला.

चालुक्य नगरातील या अग्नितांडवात अनेक छोटे दुकाने जळून गेली. चहा, वडापाव, पाणीपुरी अशी अनेक रस्त्याकडील दुकाने तिथे होती. या दुकानांवरच आपला उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या गरीब विक्रेत्यांचे सर्वस्व आगीत भस्मसात झाले. आपल्या डोळ्यांसमोर उपजीविकेचे साधन जळताना पाहून दुकानदार हताश होऊन रडत असल्याचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!