Uncategorized
Trending

बेल्कॉन २०२६’ आगळावेगळा आनंददायी अनुभव असेल,इ्व्हेंट चेअरमन प्रशांत वांडकर यांचा विश्वास

 

बेलगाम प्राईड/ उत्तर कर्नाटकातील बांधकाम क्षेत्रातील एक प्रमुख उपक्रम म्हणून ओळखले जाणारे ‘बेल्कॉन २०२६’ हे भव्य बांधकाम आणि गृहनिर्माण प्रदर्शन क्रेडाई बेळगाव आणि यश इव्हेंट्स या कार्यक्रम आयोजकांकडून आयोजित केले जात आहे.हे प्रदर्शन बेळगावकरांसाठी एक आगळावेगळा आनंददायी अनुभव ठरणार आहे ही माहिती कार्यक्रम इ्व्हेंट चेअरमन प्रशांत वांडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे बांधकाम आणि गृहनिर्माण प्रदर्शन असलेल्या ‘बेल्कॉन’च्या आठव्या पर्वाचे आयोजन ५ ते ८ फेब्रुवारी २०२६ या चार दिवसांसाठी क्लब रोडवरील सी.पी. एड मैदानावर भव्य वातानुकूलित शामियान्यात करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दररोज सकाळी १०:०० ते रात्री ९:०० पर्यंत खुले राहील. चार दिवस चालणारे प्रदर्शनात प्रत्येक दिवशी लकी ड्रॉ स्वरूपात एक लाख रुपयांच्या भेटवस्तू भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहेत.प्रदर्शन उद्घाटनाला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह आमदार राजू शेठ, क्रेडाईचे राज्य अध्यक्ष भास्कर नागेंद्रप्पा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर नटरंग चित्रपटाच्या नायिका सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचीही यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

बेल्कॉन प्रदर्शनात सुमारे १ लाख चौरस फूट जागेत उभारलेल्या मंडपात १८० स्टॉल्स असतील, ज्यात बेळगाव शहरातील ३०० हून अधिक रिअल इस्टेट प्रकल्पांचे प्रदर्शन केले जाईल. बांधकाम साहित्य आणि गृह वित्त/बँकिंग सेवा देणाऱ्या नामांकित कंपन्या आणि वित्तीय संस्थांचे ६० हून अधिक स्टॉल्स देखील उपलब्ध असतील.या प्रदर्शनात बांधकाम क्षेत्रातील प्रमुख बिल्डर्स, वास्तुविशारद, अभियंते, बँकर्स आणि तज्ञ सहभागी होणार आहेत.जी.एम इलेक्ट्रिकल्स कंपनीचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेले वाहन सर्वांसाठी आकर्षण ठरणार आहे.

सर्वसामान्य नागरिक एकाच छताखाली विविध घरे, भूखंड, फ्लॅट्स, व्यवसायासाठी व्यावसायिक भूखंड, संकुले, नवीन बांधकाम साहित्य आणि नवीन अंतर्गत सजावटीचे नमुने पाहू शकतील आणि त्यांना आवडेल ते खरेदी करू शकतील. घर बांधण्याचा विचार करणाऱ्या सर्व स्तरातील लोकांना या प्रदर्शनातून सर्वसमावेशक माहिती मिळेल. त्याचबरोबर या प्रदर्शनात बेळगाव शहराच्या प्रगतीचे मार्ग या अनुषंगाने कॉन्क्लेव्ह आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात मान्यवर तज्ञ सहभागी होणार आहेत.

वेगाने वाढणाऱ्या बेळगाव शहरात लोकांना स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी अशा प्रदर्शनांची आवश्यकता आहे. यामुळे संपूर्ण राज्यात या महानगराविषयी जागरूकता वाढेल आणि भांडवली गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासही मदत होईल. बेल्कॉन प्रदर्शनाला प्रिया शक्ती स्टील, ओरिओनिस बिल्डर्स, जीएम इलेक्ट्रिकल्स, श्रीराम इनोव्हेशन, विशाल इन्फ्राबिल्ड, विवा डेव्हलपर्स, अमर कन्स्ट्रक्शन, साई राज बिल्डर्स, चैतन्य प्रॉपर्टीज, नुराणी डेव्हलपर्स, पार्वती कन्स्ट्रक्शन, कोणे एलिव्हेटर्स, यश पॉली, विजय धामणेकर, फॅब टेक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रायोजकत्व दिले आहे.

या प्रदर्शनात सुप्रसिद्ध झांज पथक, म्युझिकल बँड, फूड कोर्ट यामधून प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना एका वेगळ्याच आनंददायी प्रदर्शनात सहभागी झाल्याचा अनुभव निश्चितच प्राप्त होईल. आयोजकांनी बेल्कॉन प्रदर्शनाला सुमारे १.५ लाख लोक भेट देतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी, इव्हेंट व्हा. चेअरमन प्रशांत पाटील, कोषाध्यक्ष सुधीर पनारे, जनसंपर्क प्रमुख सचिन बैलवाड, उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी, सहसचिव सचिन कळ्ळीमणी, ज्ञानेश्वर सायनेकर, वीरेश शेट्टण्णावर, राजेश माळी, दीपकुमार शेख, दीपक गोजगेकर, महिला विभाग कर्नाटक राज्य समन्वयक दीपा वांडकर, करुणा हिरेमठ, सचीव सविता सायनेकर, युथ विंग समन्वयक अभिषेक मुतकेकर, सचिव जयराज माळी आणि यश इव्हेंट्सचे संचालक अजिंक्य कालकुंद्रीकर आणि विनय कदम आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!