
बेलगाम प्राईड/ सालाबादप्रमाणे या वर्षी ही जीएसएस पी यु काॅलेजचे विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने वार्षिक परीक्षेस सामोरी गेले आणि यश ही संपादन केले आहे. या वर्षी 93% टक्के निकाल प्राप्त केला आहे.
मागील काही वर्षापासून बारावी परीक्षेस बसणाय्रा विद्यार्थीची विशेष तयारी प्राचार्याच्या देखरेखीखाली विशेष शिक्षकांच्या समुहाद्वारे करून घेण्यात येत होती याचा फायदा विद्यार्थी वर्गाचे गुणांक वृध्दि होण्यासाठी होत आहे, या विशेष वर्गांसाठी विद्यार्थी आणि पालक यांचा प्रतिसाद ही चांगला मिळत आहे.
या कार्यात प्राध्यापक वर्गाचे ही मोलाचे योगदान आहे. या पूर्ण प्रक्रियेचा चांगला प्रभाव बारावीच्या निकाला मधून स्पष्ट होत आहे. या वर्षी ही विद्यार्थी वर्गाने आपले ध्येय गाटून उत्तम प्रगती परिक्षेत दाखवली आहे, या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे एस के ई सोसाइटीचे अध्यक्ष डाॅ. किरण ठाकुर, उपाध्यक्ष एस वाय प्रभू ,इतर सभासद, प्राचार्य, प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यास भावि भविष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या आहेत.




