Uncategorized
Trending

बेळगावचा हॉकीसंघ अ.भा. नॕशनल चॕंपीयनशीप स्पर्धेसाठी दिल्लीला रवाना 

बेलगाम प्राईड/ भारत सरकारच्या क्रीडा खात्यातर्फे अखिल भारतीय नॅशनल हाॅकी चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेचे आयोजन 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धा राजीव गांधी क्रीडा मैदानावर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी हॉकी बेळगावच्या वतीने मुला व मुलींचा संघ दिल्लीला रवाना झाला आहे.

मुलींच्या संघामध्ये प्राजक्ता निलजकर, भावना किलारकी, विजयालक्ष्मी मुलीमनी, खुषी गुरव, वैष्णवी मावळणकर, नेत्रा गुरव, संपदा कणबरकर, मनीषा शिगीहळ्ळी, सुकृती कासार, प्रतीक्षा गुरव, निकिता कावळेकर, प्रणाली डुकरे, भूमि कुगजी, अनिता पम्मार, बीबीजाहिरा मुल्ला, सुकृती हिरेमठ, निधी पाटील, संजोता चौगुले, यशिका कराडे, निर्मला मल्लडी तर मुलांच्या संघांमध्ये प्रशांत कराडे, चेतन दोडमनी सागर बबली, शशांक कुरपे, श्लोक मराठे, अभिषेक कोकणी, आनंद भांटे, पुनीत कग्गणगी, मंजुनाथ नाईक, निखिल बागडी, प्रेम पितांबी, अभिषेक दोडमणी, आदर्श आमटी, सुरज हुडेद, गणेश कोरे, शुभम नायक, दर्शन बस्तवाड, यश पाटील, दर्शन नंदेश्वर, विवेक संगणनावर, मल्लिकार्जुन दरेनावर, वरूण कोलकार, विशाल कोलकार यांचा समावेश आहे.

हॉकी संघाला हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी व उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सचिव सुधाकर चाळके, संघ व्यवस्थापक सविता वेसणे, प्रशिक्षक राजू यल्लाप्पा देशनूर, उत्तम शिंदे, संतोष दरेकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!