
बेलगाम प्राईड/ स्विमर्स क्लब बेळगाव आणि ॲक्वेरियस स्विम क्लब बेळगावचे सदस्य असलेले तीन यशस्वी होतकरू दिव्यांग (पॅरा) जलतरणपटू श्रीधर माळगी, सिमरन गौंडाळकर आणि स्वतीक पाटील हे तिघे येत्या 20 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट अँक्वेटिक सेंटर येथे होणाऱ्या पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीज-2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असून त्यासाठी ते लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत.
श्रीधर माळगी हा 25 वर्षीय जलतरणपटू आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीचा आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 13 वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच 7 सुवर्ण, 12 रौप्य व 7 कांस्य अशी 26 आंतरराष्ट्रीय पदके आणि 47 सुवर्ण, 9 रौप्य व 1 कांस्य अशी 57 राष्ट्रीय पदके जिंकली आहेत. अलिकडेच त्याला कर्नाटक राज्याचा खेळाडूंसाठी दिला जाणारा एकलव्य पुरस्कार या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सिमरन गौंडाळकर ही एक समर्पित आणि प्रतिभावान दिव्यांग जलतरणपटू असून तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिने 1 सुवर्ण व 2 रौप्य अशी तीन आंतरराष्ट्रीय पदके आणि 30 सुवर्ण आणि 2 रौप्य अशी 32 राष्ट्रीय पदके जिंकली आहेत. स्वातिक पाटील या दिव्यांग जलतरणपटूने देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने 33 सुवर्ण, 7 रौप्य व 2 कांस्य अशी 42 राष्ट्रीय पदके मिळवली आहेत. आता या तिघांची ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट ॲक्वेटिक सेंटर येथे होणाऱ्या पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीज -2026 अर्थात दिव्यांग जलतरण जागतिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय संघात निवड झाली असून ते लवकरच ऑस्ट्रेलियाकडे रवाना होणार आहेत.
हे तीनही जलतरणपटू बेळगाव येथील सुवर्ण जेएनएमसी स्विमिंग पूल (ऑलिंपिक आकार) येथे जलतरण गुरु उमेश कलघटगी यांच्यासह प्रशिक्षक अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर व गोवर्धन काकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी 3 तास समर्पित सराव करत प्रशिक्षण घेतात. या सर्वांना केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, पॉलिहायड्रॉन फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप चिटणीस, अलायड फाऊंडर्स बेळगावचे सीएमडी राम मल्ल्या, एसएलके ग्रुप, बंगलोर, डॉ. नितीन खोत, रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर आणि इतरांचा




