
बेलगाम प्राईड/कोल्हापूर मे २०२६ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. कोल्हापूर विभागातून परीक्षेला बसलेल्या २७८ विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. त्यात प्रज्वल संजय पाटील यानेही उज्ज्वल यश मिळविले आहे. सीए ही देशातील सर्वाधिक कठीण आणि स्पर्धात्मक व्यावसायिक परीक्षा मानली जाते. त्यामुळे या परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यास, संयम आणि कठोर परिश्रमांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत प्रज्वलने उत्तुंग यश मिळविले आहे.




