
बेलगाम प्राईड/ बेळगाव होलसेल फुल मार्केट सुरू करण्याचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एकतर अशोकनगर येथील बागायत खात्याने सुरू केलेले मार्केट अथवा एपीएमसी येथेही मार्केट सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाची हरकत नाही. तसेच व्यापाऱ्याच्या मागणीनुसार होलसेल फुल मार्केट संदर्भात नव्याने निविदा काढण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी होलसेल फुल मार्केट व्यापाऱ्यांना दिले.
अशोकनगर येथील फुल मार्केटमध्ये दुकानगाळे अपुरे पडल्याने काही व्यापाऱ्यांनी किल्ला येथील भरतेश कॉलेजसमोरील कॅन्टोन्मेंटच्या खुल्या जागेत मार्केट सुरू केले होते. परंतु याला अशोकनगर येथील व्यापाऱ्यांनी विरोध करत शहरात दोन मार्केट नको, असे म्हणाले होते. कॅन्टोन्मेंट होलसेल फुल मार्केट
एपीएमसीच्या एपीएमसी कायद्यात बसत नसल्याने ते बंद ठेवण्याची सूचना बागायत खात्यासह अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतरही हा वाद सुरू राहिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनीच तोडगा काढावा, व अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. बुधवारी शिवाजीनगर येथे महिला बालकल्याण खात्याच्या कार्यालयात फुल मार्केटमधील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, एपीएमसी अथवा अशोकनगर जेथे व्यापाऱ्यांना योग्य वाटेल तेथे त्यांनी मार्केट सुरू करावे, दुकानगाळे कमी पडल्यास त्याठिकाणी वाढीव दुकानगाळे देण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले. माध्यमांशी बोलताना आमदार आहे.
व्यापाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : एपीएमसी अथवा अशोकनगर येथे मार्केट सुरू करण्यास ना हरकत
अशोकनगर येथील होलसेल फुल मार्केट झालेल्या निविदा प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने निविदा काढाव्यात, तसेच यापूर्वी जे व्यापारी दुकान चालवित होते. त्यांना फुल मार्केटमध्ये प्राधान्य द्यावे, तसेच निविदा दोन वर्षांकरिता न करता त्या ५५ महिन्यांपर्यंत वाढवाव्यात, अशीही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यापाऱ्यांनी केली. –
बेळगाव होलसेल फुल मार्केटमध्ये व्यापाऱ्यांसोबत चर्चा करताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व आमदार आसिफ सेठ. म्हणाले, व्यापाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट हद्दीत फुल मार्केट सुरू केले होते. परंतु ते मार्केट एपीएमसी कायद्यामध्ये बसत नसल्याने पुन्हा अशोकनगर येथे फुल मार्केट सुरू करण्यात आले. त्याठिकाणच्या व्यापाऱ्यांच्या काही मागण्या असून त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, त्याचबरोबर २७ दुकानदारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले




