Uncategorized
Trending

मुरगेंद्रगौडा पाटील क्रिकेट चषकाचा पांडुरंग सीसी संघ मानकरी ठरला 

बेलगाम प्राईड/ मुरगेंद्रगौडा चषक अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील साईराज वॉरियर्स उपविजेता : ओमकार किणी दुचाकीचा मानकरी मुरगेंद्रगौडा चषक अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पांडुरंग सीसी संघाने साईराज वॉरियर्स संघाचा ७ गडीनी पराभव करून मुरगेंद्रगौडा चषकासह ५ लाखाचे बक्षिस पटकाविले. ओमकार किणीने मालिकावीरासह दुचाकी वाहनाचे बक्षिस तर अंतिम सामन्यातील कुरेशीला सामनावीर गौरविण्यात आले. 

सरदार्स मैदानावरती खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना साईराज वॉरियर्सने पहिल्या डावात १० षटकात ६ गडी बाद १३८ धावा केल्या. त्यात सुमीतने ३ षटकार, ३ चौकारासह ४३, विशाल शहाने २ षटकार, २ चौकारांसह ३२, कर्णधार ओमकार किणीने १ षटकार, ४ चौकारांसह २३ तर विकी मुंबईकरने २ षटकार, २ चौकारांसह २० धावा केल्या. पांडुरंग सीसीतर्फे जैद पठाणने २ तर प्रवीण रब्बानी व राजेश यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

त्याला उत्तर देताना पहिल्या डावात पांडुरंग सीसी संघाने १० षटकात ६ गडी बाद १३९ धावा करून १ धावेची आघाडी मिळविली. त्यात डावखुऱ्या इजाज कुरेशीने सलामीला फलंदाजी करत ३ उत्तुंग षटकार आणि ५ चौकारांसह २४ चेंडून ५० धावा करून अर्धशतक झळकविले. त्याला योगेश पेनकरने ५ षटकार, १ चौकारासह १३ चेंडूत ३९ तर रजत एमने ३ षटकार, ३ चौकारांसह ३५ धावा केल्या. साईराजतर्फे साहिल लोंग्लेने २८ धावात ३ तर हिमांशू व जयदीपने १ गडी बाद केला.

https://www.facebook.com/share/v/1F3x8Z2ZdF/

दुसऱ्या डावात साईराज वॉरियर्सने १० षटकात सर्व गडीबाद ८७ धावा केल्या. त्यात सुमीतने ५ चौकारांसह ३६ तर विकी मुंबईकरने २८ धावा केल्या. पांडुरंग सीसीतर्फे प्रवीण श्रीखंडे यांनी २४ धावात ३ तर राजेश आणि रब्बानी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. ८६ धावांचे उद्दिष्ट घेऊन खेळताना पांडुरंग सीसीने ८.२ षटकात ३ गडी बाद ८७ धावा करून सामना ७ गड्यांनी जिंकला. त्यात कृष्णा गवळीने २९, इजाज कुरेशीने २१ तर योगेश पेनकरने १८ धावा केल्या. साईराजतर्फे संकेत, साहिल, हिमांशू व जयदीप यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला

सामन्यानंतर हुक्केरी हिरेमठ श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, खासदार जगदीश शेट्टर व पुरस्कर्ते मुरगेंद्रगौडा पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पांडुरंग सीसी संघाला ५ लाख २७ हजार १२७ तर उपविजेत्या साईराज वॉरियर्सला २ लाख २७ हजार १२७

अंतिम सामन्यातील सामनावीर व उत्कृष्ट फलंदाज इजाज कुरेशी, पांडुरंग सीसी, उत्कृष्ट गोलंदाज साहिल लोंग्ले साईराज तर मालिकावीर ओमकार किणी साईराज दुचाकी व व चषक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री स्पोर्ट्स खडक गल्लीचे निकश कांबळे, प्रसाद शिरवलकर, विनायक चव्हान, सुनिल पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!