Uncategorized
Trending

मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांना ‘मुख्यमंत्री पदक’ जाहीर

बेलगाम प्राईड/ बेळगाव मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष दयानंद सत्यनाईक यांना पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल 2025 सालचे ‘मुख्यमंत्री पदक’ जाहीर झाले आहे.

पोलीस दलामध्ये गेल्या 11 जानेवारी 1999 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू झालेल्या संतोष दयानंद सत्यनाईक यांना 4 मे 2025 मध्ये पोलीस निरीक्षक पदावरून पोलीस उपाधीक्षक पदावर बढती मिळाली होती. त्यानंतर गेल्या 4 सप्टेंबर 2024 पासून ते बेळगाव शहरातील मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणून सेवा बजावत आहेत.

पोलीस खात्यामध्ये संतोष सत्यनाईक गेल्या सुमारे 27 वर्षापासून निष्ठेने कार्यरत असून या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह गुन्ह्यांना आळा घालून गुन्हेगारांचा छडा लावण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे दोन गंभीर प्रकरणांमध्ये आरोपींना न्यायालयाकडून सक्तमजुरीची शिक्षा होण्यासाठी त्यांचे विशेष परिश्रम कारणीभूत ठरले आहेत.

बेळगाव शहरातील कन्नड व मराठी भाषिकांमधील वाद, त्याचप्रमाणे श्री गणेश उत्सव, कर्नाटक राज्योत्सव, रमजान सण वगैरे सारख्या प्रसंगी उद्भवणारी परिस्थिती कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊन न देता सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यनाईक मोठ्या कौशल्याने हाताळत असतात. मार्केट उपविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या एकूण 22 प्रकरणांचा छडा लावून 47,90,884 रुपये किमतीचे एकूण 715.79 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यास त्यांचे प्रामाणिक प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत.

पोलीस दलातील एक शिस्तप्रिय उत्साही अधिकारी म्हणून सुपरिचित असणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनाईक यांचे एकंदर उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने त्यांना 2025 सालचे ‘मुख्यमंत्री पदक’ जाहीर केले आहे. याबद्दल सध्या त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!