सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न करणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

बेलगाम प्राईड/ मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून सीमाभागातील नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत, त्या योजनांची व्याप्ती. तसेच संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाला मोठा इतिहास आहे. सीमाभागातील नागरिकांनी मोठा लढा उभारला.सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न करणार
या लढ्यात छगन भुजबळ तसेच. एकनाथ शिंदे यांनी तुरुंगवासपण भोगला, आता जी समिती यासाठी नेमली आहे, त्यांना सगळी कागदपत्रे पुरवली, जे वकील सांगितले, ते उभे केले, मात्र सर्वोच्च न्यायालयांत तीनवेळा असे झाले की ज्यावेळेस हा खटला बोर्डावर आला त्यावेळी तीन न्यायाधीशांपैकी कधी एक न्यायाधीश महाराष्ट्रातला तर कधी कर्नाटकतला असायचा. त्यामुळे न्यायालयाचा
असा नियम किंवा तत्त्व आहे की तिन्ही न्यायाधीशांपैकी कोणीही दोन्ही राज्यातील नसला पाहिजे अन्यथा खटल्यावर त्याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे सीमाप्रश्नाचा खटला प्रबळपणे लढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.




