Uncategorized
Trending

कर्करोगाच्या आजाराने त्रस्त झालेल्या डॉक्टरने स्वतःला गोळ्या घालून केली आत्महत्या

टिळकवाडी मंडोळी रोड येथील घटना

बेलगाम प्राईड/ कर्करोगाच्या आजाराने त्रस्त असलेल्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी गोडसेवाडी-मंडोळी रोड परिसरात घडली.

डॉ. दिनेश लक्ष्मण भटकळ (वय ७९) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. ते मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील रहिवासी असून, अनेक वर्षे वैद्यकीय सेवा बजावल्यानंतर बेळगावमध्ये स्थायिक झाले होते. साधे, मनमिळावू व्यक्तिमत्त्व आणि सेवाभावी वृत्तीमुळे ते समाजात तसेच वैद्यकीय क्षेत्रात आदराचे स्थान मिळवले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भटकळ यांनी त्यांच्या घराच्या बाल्कनीत स्वतःवर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

काही काळापासून ते गंभीर आजारपण आणि मानसिक नैराश्याने त्रस्त होते, अशी माहिती समोर आली आहे. याच कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!