गोवा राज्याची दारूची विक्री करणाऱ्यावर पोलिसांचा छापा
उघड्यावर मद्य व्यसन करतेवेळी एकाला अटक ग्रामीण पोलिसांची कारवाई

बेलगाम प्राईड/ बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध मद्यविक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्यां विरोधात पोलिसांनी कडक मोहीम राबवली आहे. उद्यमबाग आणि बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन स्वतंत्र कारवायांमध्ये आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
उद्यमबाग पोलिसांनी वाघवडे मारुती गल्ली येथील परमेश्वर देवाप्पा नायक हा गोवा राज्याची विनापरवाना दारूची विक्री करताना रंगेहात पकडले. आरोपीकडून सोळा बॉटल दारूच्या जप्त केल्या असून यामध्ये रम आणि ओडका या कंपन्यांच्या मद्याच्या 16 बाटल्या याची 4,760 रुपये तर रोख 3,550 असे एकूण तेरा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर अबकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे किरण होनकट्टी यांनी सांगितले.

दुसऱ्या कारवाईत बेळगाव ग्रामीण पोलिसांनी राजहंसगड किल्ला परिसरात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे मद्यसेवन करणाऱ्या सातेरी ओऊळकर याला ताब्यात घेतले. सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर अबकारी कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती लक्कप्पा जोडट्टी यांनी दिली.
पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी या यशस्वी मोहिमेबद्दल दोन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. अवैध धंद्यांविरोधात भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.




