एल अँड टी विभागाचे निकृष्ट काम विनापरवाना रस्त्याचे खोदकामे
अशा खोदकामामुळे शहर परिसरात वाहतुकीला अडथळा

बेलगाम प्राईड/शहर परिसरात एल अँड टी विभागाने कुपनलिकेची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत यामुळे शरीरातील कुपनलिका फुटून पाण्याची गळती लागली आहे. असाच हा एक प्रकार म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चौक येथे कुपनलिका फुटून गेल्या दोन दिवसापासून गळती लागली होती.
यावर नागरिकांनी आवाज उठवताच मनपाने येऊन याकडे पाहणी केली यानंतर मंगळवारी एल अँड टी विभागाने समादेवी मंदिर समोर असलेले सीडी वर्क चे काम विनापरवाना काही कारणास्तव फोडून काढून रस्त्यात अडथळा निर्माण केला आहे. यामुळे दिवसभर वाहतुक कोंडी होत आहे. यावर मनपाने काना डोळा केला असल्याचे निदर्शनास आले आहे.
नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त करून महानगरपालिकेचे शहरातील नागरी समस्यांची अशा कामकडे कानाडोळा होत असल्यामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून एल एन टी विभागावर कारवाई करण्याचे आदेश देऊन नागरिकांच्या समस्या दूर करण्यात याव्यात अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त केली जात आहे.




