
बेलगाम प्राईड: बेळगाव वाणिज्य आणि उद्योग संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्योग आणि वाणिज्य प्रदर्शन बेलॅक्स -2026 ला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी भेट दिली.
प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती घेताना रोशन यांनी या नमुना प्रदर्शनाच्या आयोजनाचे कौतुक केले. महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनीही उपस्थित राहून सर्व स्टॉल्सची पाहणी केली. वाणिज्य आणि उद्योग संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांचा सत्कार करण्यात आला.




