Uncategorized
Trending

गणेश मूर्ती विसर्जनासाठी कपिलेश्वर तलावाचा आकार वाढणार  नगरसेवकांनी केली पाहणी

बेलगाम प्राईड/ शहरातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यासोबतच गणेशमूर्तींची उंचीही वाढत असल्याने मूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध सुविधा अपुऱ्या पडत आहेत. या पार्श्वभूमीवर जुन्या कपिलेश्वर तलावाचा विस्तार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

सध्या कपिलेश्वर परिसरातील जुन्या तलावात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र वाढत्या मूर्तींच्या संख्येमुळे व त्यांच्या आकारामुळे तलावाची क्षमता मर्यादित ठरत आहे. त्यामुळे तलावाचा आकार वाढवून विसर्जन प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

यासंदर्भात काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी तलाव परिसराची पाहणी करून सर्वेक्षण केले होते. या पाहणीनंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अनुप आणि अन्य अधिकाऱ्यांनी तलावाला भेट देत काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी नगरसेवक राजू भातकांडे, वैशाली भातकांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रशासनाच्या या निर्णयामुळे येत्या गणेशोत्सवात मूर्ती विसर्जन प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!