Uncategorized
Trending

बेळगावात घरफोडी करणाऱ्या टोळीला बेळगाव पोलिसांनी केली अटक 

चोरांकडून 67.93 लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त

बेलगाम प्राईड/ बेळगाव शहरातील विविध भागांत चोरट्यानी घरफोडी करून दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. अमन नगर, उज्ज्वल नगर, मारुती नगर, शाहू नगर आणि वीरभद्र नगर या परिसरात घरांचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून सोने-चांदीचे दागिने चोरी केलेल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी एकूण पाच आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे 64,47,690 रुपयांचे 415.98 ग्रॅम सोन्याचे दागिने तर 3,45,735 रुपयांचे 1329.75 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. एकूण जप्तीची किंमत सुमारे 67,93,425 रुपये इतकी आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त भूषण बोरसे उपायुक्त निरंजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर मार्केटचे सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यनायक नेतृत्वाखाली माळमारुती पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गडेकर यांच्या सहकारी पोलीस उपनिरीक्षक व पथकाने ही यशस्वी मोहीम राबवली. तपास आणि अटकेच्या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी विशेष कौतुक करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!