Uncategorized
Trending

कन्नडमधील ‘एसआयआर’ फॉर्म्सच्या अडचणी सोडवण्यासाठी म ए समिती कडून  मदत केंद्र

बेलगाम प्राईड/ वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिर राजवाडा कंपाऊंड मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी नगरसेवक मनोहर हलगेकर सुरेश रेडेकर वर्षा आजरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

सध्या सुरू असलेल्या ‘एसआयआर’ (SIR) मोहिमेअंतर्गत मिळणारे फॉर्म्स हे कन्नड भाषेत असल्यामुळे, वडगाव आणि परिसरातील मराठी भाषिक मतदारांना ते भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत.

मराठी भाषिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी म.ए समितीच्या कार्यकर्त्यांनी एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ज्ञानेश्वर मंदिर येथे रोज संध्याकाळी ६ ते ८ या दोन तासांच्या वेळेत समितीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या दोन तासांत मतदारांना फॉर्म भरताना किंवा इतर प्रक्रियेत येणाऱ्या सर्व अडचणींचे निवारण केले जाईल आणि त्यांना मार्गदर्शन केले जाईल.

या बैठकीला म ए समितीचे युवा कार्यकर्ते सागर पाटील, सुनील बोकडे विठ्ठल पोळ, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर , कीर्तीकुमार कुलकर्णी, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, माजी नगरसेवक सुरेश रेडेकर, ज्ञानेश्वर मुन्नूर, भाऊराव पाटील, महादेव पाटील यांच्यासह समितीचे अन्य प्रमुख कार्यकर्ते आणि स्थानिक मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!