Uncategorized
Trending

वज्रनाद ढोल पथकाचा १० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

बेलगाम प्राईड/ मारुती गल्ली येथील वज्रनाद ताशा ढोल पथकाला दहा वर्षे पूर्ण झाली या निमित्याने वर्धापन दिन मराठा इन्फंट्रीचे कमांडर गिरीश उपाध्या यांच्या प्रमुख उपस्थितीत वाद्याचे पूजन करून मंगळवारी सायंकाळी उत्साहात साजरा करण्यात आला. 

कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशा वाद्यांचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन आणि आरतीने करण्यात आली. यावेळी मराठा इन्फंट्रीचे डेप्युटी कमांडंट विनोद पाटील, मेजर खोत, सुभेदार मेजर तसेच पथकाचे अध्यक्ष अतुल कडेमणी, गणेश मंडळाचे प्रमुख अर्जुन पुजारी, श्रीराम पुजारी आणि इतर मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी ब्रिगेडियर गिरीश उपाध्या यांनी आपल्या मनोगतात पथकाच्या दहा वर्षांच्या उल्लेखनीय आणि यशस्वी वाटचालीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, अशाच प्रकारे कला, संस्कृती आणि परंपरांचे जतन करत युवा पिढीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. ढोल-ताशा पथकाच्या माध्यमातून शिस्त, सांस्कृतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी जपत मंडळाचे नाव अधिक उज्ज्वल करावे. भविष्यातही पथकाने सातत्याने प्रगतीची नवी शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या. या ढोल पथकाला रोख 25 हजाराची ची देणगी दिली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी वज्रनाथ ढोल-ताशा पथकाने प्रभावी आणि दमदार वादन सादर करून उपस्थित नागरिक व मान्यवरांची मने जिंकली. पथकाच्या आकर्षक, शिस्तबद्ध आणि दर्जेदार सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद व प्रशंसा मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!