Uncategorized
Trending

राज्यस्तरीय सब ज्युनियर जलतरण स्पर्धेत दिशा, निधी, अर्णव यांचे यश

बेलगाम प्राईड/ कर्नाटक राज्य संघटनेच्या वतीने मंगळूर येथील यमिकेरे जलतरण तलावात आयोजित केलेल्या सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूनी उत्कृष्ट कामगिरी करून घवघवीस यश संपादन केले.

कुमारी दिशा होंडी (जे एस डब्ल्यू) अकॅडमी हिने 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक 28.74 सेकंद 100 मीटर फ्रीस्टाइल मध्ये रौप्य पदक 1:02.56 सेकंद तसेच 100 मीटर बटरफ्लाय मध्ये रौप्य पदक 1:08.51 सेकंद , कुमारी निधी मुचंडी हिने 100 मीटर फ्रीस्टाइल मध्ये कांस्यपद 1:08.90 सेकंद, कुमार अर्णव किल्लेकर यांनी 200 मीटर बटरफ्लाय मध्ये रौप्य पदक 2.27.38 सेकंद यांनी यश संपादन केले.

कुमारी दिशा होंडी हिची पुढील महिन्यात जयपुर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भाग घेण्यासाठी कर्नाटक राज्य संघात अभिनंदनीय निवड झाली आहे. वरील सर्व जलतरणपटू हे आबा हिंद क्लबचे सदस्य असून त्यांना एन आय एस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच क्लबचे अध्यक्ष श्री शितल हुलभत्ते श्री अरविंद संगोळी, सौ शुभांगी मंगळूरकर, नगरसेवक श्री नितीन जाधव यांचे प्रोत्साहन लाभते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!