Uncategorized
Trending

बेळगाव कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील १४.६० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी

बेलगाम प्राईड/ कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुधारणा, क्रीडा विकास आणि स्वच्छता अभियानासह अर्बन चॅलेंज फंड योजनेअंतर्गत सुमारे १४.६० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.प्रकल्‍पांसाठी निधी उभारणीचा आराखडा निश्‍चित करण्‍यात आला आहे. एकूण खर्चापैकी २५ टक्‍के (३.६५ कोटी) केंद्र शासनाकडून अनुदान रुपात मिळणार असूत तेवढाच २५ टक्‍के निधी कॅन्टोन्मेंट बोर्ड उभारणार आहे. उर्वरित ५० टक्‍के निधी बँक कर्ज किंवा सार्वजनिक खासगी भागीदारीच्‍या माध्‍यमातून उभारण्‍यात येणार आहे.

१४.६० कोटी रुपये कोटींच्‍या प्रकल्‍पात सर्व्हे क्र. २९९-बी येथे लॉजिंग सुविधेसह व्यापारी संकुल उभारणे, कोटे तलाव परिसर आणि हेड पोस्ट ऑफिस रस्त्याजवळ फूड कोर्टची निर्मिती, होंडा शोरूमच्या समोर शॉपिंग कॉम्प्लेक्स विकसित करणे, विद्यमान कम्युनिटी हॉलजवळ खुले नाट्यगृह आणि बहुउद्देशीय सभागृह बांधणे. विविध प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात आले आहे. यात बिवूर रोड, कॅटल रोड, हाय स्ट्रीट मार्गाचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!