
बेलगाम प्राईड/ साई स्पोर्ट्स अकॅडमी खानापूर आयोजित 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेस किरण जाधव यांनी एक संघ घेऊन त्याचे मालक म्हणून सहभाग झाला आहे.
खानापूर साई स्पोर्ट्स अकॅडमी खानापूर आयोजित अंडर-14 लिलावा वर आधारित क्रिकेट स्पर्धेसाठी बेळगाव भाजप नेते किरण जाधव – विमल फाउंडेशन सेंटर ऑफ एक्सलन्स यांनी पहिले एका संघाचे मालक म्हणून सहभाग नोंदवला आहे. या सहभागामुळे स्पर्धेला नवी उभारी मिळणार असून आयोजकांनी आनंद व्यक्त केला आहे.
किरण जाधव यांच्या विमल फाउंडेशनने नेहमीच उत्कृष्ट क्रीडा क्षेत्र जपत बेळगाव परिसरातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन व पाठबळ देण्याचे काम सातत्याने केले आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. त्यांचे चिरंजीव ही एक क्रिकेटपटू आहेत.
या स्पर्धेमुळे १४ वर्षांखालील तरुण क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार असून लिलावाच्या आधारित लीगचा अनुभवही घेता येणार आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूंना भविष्यातील मोठ्या स्पर्धांसाठी तयारी करण्यास मदत होणार आहे.
तरुण क्रिकेटपटूंना पाठबळ देत क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल श्री. किरण जाधव व विमल फाउंडेशन यांचे आयोजकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.




