
बेलगाम प्राईड/ सुळगा गावात क्राईम विभागाच्या पोलिसांनी धाड घालून सुमारे 2.50 लाख रुपये किमतीचे १२.९२ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. शनिवारी ही धाड घालण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोघा जणांना अटक केली आहे. नागेश मधुकर भगत (वय 35) मूळचा सावंतवाडी सध्या रा. देशपांडे गल्ली सुळगा आणि राहुल ज्योतिबा जाधव (वय 33) कंग्राळी के एच सध्या रा. देशपांडे गल्ली सुळगा अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत सीसीबी विभागाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.
बेळगाव शहर गुन्हे शाखेचे पोलीस सुळगा येथील देशपांडे गल्ली येथे टाकलेल्या छाप्यात दोघांना अटक केली संशयित हेरॉईन घरात साठवून ठेवून विक्री करत असल्याचे समोर आले होते. पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री आणि त्यांच्या पथकाने छापा टाकण्यात आला यामध्ये (अदिती या श्वानाच्या) सहाय्याने ही कारवाई करण्यात आली यामध्ये भगत आणि जाधव यांना अटक केली तपासा दरम्यान त्यांच्या घरातील उशीत लपवून ठेवलेले सुमारे 12.92 ग्रॅम अर्थात 119 पुड्या हेरॉईन आढळून आले याची किंमत अंदाजे 2 लाख 60 हजार रुपये इतकी होते. तसेच दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
या चौकशीमध्ये संशयित आणि मुंबईतील कोळीवाडा परिसरातील संतोष नावाच्या व्यक्तीकडून हेरॉईन आणून स्थानिक पातळीवर विक्री करत असल्याची कबुली दिली आहे. संबंधित तिसरा संशयित सध्या पसार झाला आहे. काकती पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




