Uncategorized
Trending

खासदारांकडून जिल्ह्यातील विकास कामाची आढावा बैठक 

बेलगाम प्राईड/ खासदार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील विकास कामाचा आढावा घेतला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी केंद्र सरकारच्या रेल्वे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व विमानतळ प्रशासनाकडून सुरू असलेल्या विकास कामाची माहिती घेण्यात आली. 

बेळगाव धारवाड व्हाया रेल्वे मार्गाच्या 11,190 एकर जमिनीच्या विकासाबाबत प्रश्न विचारला असता 407 एकर जमीन यापूर्वीच संपादित केली असून उर्वरित संपादन राज्य सरकारच्या निधी अभावी रखडल्याचे सांगण्यात आले टिळकवाडी येथील रेल्वे गेटच्या कामाला लवकरच सुरुवात करण्याची सूचना करण्यात आली.

बेळगाव विमानतळाच्या विकास या संदर्भात समांतर टॅक्सी, ट्रक बांधकामासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केली.

बेळगाव हुनगुंद रायचूर या रस्त्याच्या भूसंपादनाला गती मिळाली आहे 37 किलो मीटर रस्त्याची भूसंपादन पूर्ण झाले असून 270 कोटी भरपाई वितरित केल्याची माहिती दिली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह राजश्री जयपुरी, बसवराज चव्हाण, भुवनेश कुमार, पवन गुरूवे, विमानतळ संचालक त्यागराजन रेल्वे अभियंता विनायक यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!