Uncategorized
Trending

बस चालकाचा प्रामाणिकपणा मौल्यवान वस्तूसह हरवलेली पर्स महिलेला परत

बेलगाम प्राईड / मच्छे येथील रहिवासी चैत्राली संदीप वागोजी यांची बुधवार दि. 15-04-2026 रोजी उद्यमबाग ते पिरणवाडी दरम्यान बस प्रवास करत असताना पर्स हरवली होती. ही बस वायव्य कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बेळगाव येथील दुसऱ्या डेपोतील अनुसूची क्रमांक 108 सीबीटी ते तीर्थकुंडे या मार्गवर धावत होती.

सदर बसमध्ये कर्तव्य बजावत असलेले बस वाहक सिद्धप्पा हडलगी (बिल्ला क्रमांक 5454) व चालक शिवानंद एस (चालक क्रमांक 425) यांनी प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडत हरवलेली पर्स त्या महिलेला परत केली.

बस सीबीटी येथे पोहोचल्यावर त्यांना संबंधित पर्स आढळली. त्यांनी पर्स खोलून पाहिले असता यामध्ये असलेल्या मोबाईल आणि इतर वस्तूंमधून चैत्राली वागोजी यांच्याशी संपर्क साधून बोलावले व पर्स सुरक्षितपणे सुपूर्द केली. त्या पर्समध्ये सुमारे 7,380 रुपये रोख रक्कम, सोन्याचा नथ, कानातले तसेच मोबाईल असा मौल्यवान वस्तू होत्या

या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष वर्तनाबद्दल सिद्धप्पा हडलगी व शिवानंद एस यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी  प्रामाणिकता दाखवलेली समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!