
बेलगाम प्राईड/ बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील पंत बाळेकुंद्री गावाच्या पंतनगर परिसरात सुमारे ₹3.50 कोटी खर्चातून उभारण्यात येणाऱ्या नवीन डांबरी, काँक्रीट रस्ते आणि गटार बांधकाम कामांचे बुधवारी भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला
मंत्री लक्ष्मी हेंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या महत्त्वाच्या कामांसाठी निधी मंजूर झाला असून, स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी नागेश देसाई, अप्सर जमादार, बसवराज मॅगोटी, सण्णयल्लप्प तळवार, सदाशिव हिट्टणगी, महादेव करगण्णवर, एम. आय. पाटील, ईरण्णा कोटी, मल्गौड कोडली, कल्लप्प देयण्णवर, बी. आय. तेणगी, सुरेश बरगळी, साईराम जंबगी, प्रेम कोलकार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते, गावातील मान्यवर आणि महिला उपस्थित होत्या.




