Uncategorized
Trending

धर्मस्थळाविरुद्ध कारस्थान रचणाऱ्यांवर कारवाई करा : प्रमोद मुतालिक

12-06-2026                                                 

बेलगाम प्राईड/ श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी धर्मस्थळ क्षेत्र आणि हिंदू धर्माविरुद्ध पद्धतशीर कारस्थान सुरू असल्याचा आरोप करत धार्मिक भावना दुखावल्याबद्दल अभिनेते प्रकाश राज आणि प्राध्यापक भगवान यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला.

प्रमोद मुतालिक यांनी धर्मस्थळ प्रकरणातील एसआयटी अर्जाचा संदर्भ देत अभिनेते प्रकाश राज यांच्यावर टीका केली. प्रकाश राज यांनी धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करून भावना दुखावल्या असून चित्रपटसृष्टीने त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, अशी मागणी त्यांनी केली.

दुसऱ्या एका प्रसंगाचा उल्लेख करत जानवे काढणे ही लोकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवणारी कृती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हरिहर मध्ये प्रभू श्रीरामांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापक भगवान यांना मनोरुग्णालयात दाखल करावे आणि सरकारने त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रमोद मुतालिक यांनी दिला. या पत्रकार परिषदेला राजू पवार, शिवराज अंबारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!