Uncategorized
Trending
कॅम्प पोलीस स्थानकाचे आज बीएसएनएल इमारतीत स्थलांतर
नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत चालणार कामकाज

बेलगाम प्राईड /हायस्टीट कॅम्प येथे कार्यरत असलेले कॅम्प पोलीस ठाण्याचे स्थलांतर करण्यात आले आहे. सोमवार दि. २९ जूनपासून बीएसएनएलच्या इमारतीत कॅम्प पोलीस ठाणे सुरू होणार आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
कॅम्प पोलीस ठाण्याची सध्याची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे बीएसएनएल कार्यालयाच्या आवारातील दगडी इमारतीत कॅम्प पोलीस ठाण्याचे स्थलांतर करण्यात आले आहे. या इमारतीबाहेर फलकही लावण्यात आला आहे. सोमवारपासून या दगडी इमारतीत कॅम्प पोलिसांचे कामकाज सुरू होणार आहे. यापुढे कॅम्प पोलीस ठाण्यासंबंधीच्या
कामकाजासाठी नागरिकांनी स्थलांतरित कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे. स्वतंत्र इमारत तयार होईपर्यंत स्थलांतरित जागेत कॅम्प पोलिसांचे कामकाज चालणार आहे.




