Uncategorized
Trending

डॉ.सौ.राजश्री राजू तुडयेकर यांच्या वतीने सावगाव शाळेला संगणकची भेट

बेलगाम प्राईड/ गुरुवार, दि. 25 रोजी आमच्या सरकारी मराठी मिडीयम सावगाव शाळेत आर. सर्विसेस डेव्हलपर्स बेळगावच्या संचालिका डॉ. सौ. राजश्री राजू तुडयेकर यांच्याहस्ते संगणक हस्तांतरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सागर सावगावकर हे होते.

प्रथमता उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यादेवता सरस्वती माता म्हणून फोटोपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापक  एल. एस. चांदीलकर यांनी प्रस्ताविक केले. संजय गौंडाडकर सरानी देणगीदार डॉ. सौ. राजश्री राजू तुडयेकर यांचा परिचय करून दिला. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यात आपले अनमोल असे योगदान देणाऱ्या राजश्री मॅडम यांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

त्यानंतर शाळेसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान सोयी सुविधा पैकी संगणक संचची मान्यवरांच्या हस्ते अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्याकडे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी  बंडू केरवाडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बेळगाव यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. राजश्री यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात संगणकाला अनन्यसाधारण महत्व असल्याचे सांगून सर्वांनी संगणकाचा योग्य वापर करून आपला शैक्षणिक विकास करावा असे मार्गदर्शन केले.

यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख श्री प्रदीप सुतार व श्री प्रवीण तेजम, तसेच श्री विनायक हुलजी युवासेना अध्यक्ष बेळगाव, सामाजिक कार्यकर्ते  मल्लाप्पा वाघवडेकर, राजू कदम, SDMC सदस्य ओमाना हिंडलगेकर, गजानन घाटेगस्ती शाळेचे शिक्षक – शिक्षिका श्रीमती आर. एस. मोतेकर , आर.डी. पाटील, श्रीमती आर.एन. कदम, आय.जे. कांबळे, श्री. संतोष खेमजी, एस.एन. इटगीकर इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय गौंडाडकर सर यांनी केले आणि आभार एल.एस.चांदीलकर सर यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!