Uncategorized
Trending

बेळगाव जिल्ह्यातील मंदिरांमधील चोऱ्या करणारी टोळी गजाआड

BelgaumPride -July 15, 2026

बेलगाम प्राईड/ बेळगाव जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये चोऱ्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा हारुगेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २५ लाख ८९ हजार २९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी १ तोळा ५ मिली सोन्याचे दागिने, ७ किलो ७६० ग्रॅम चांदीचे दागिने, २९ किलो ५०० ग्रॅम कांस्य धातूच्या वस्तू आणि गुन्ह्यात वापरलेली एक महिंद्रा पिकअप गाडी जप्त केली आहे.

पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत या आरोपींनी हारुगेरीसह अथणी, कागवाड, ऐगळी आणि लोकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक मंदिरांमध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!