Uncategorized
Trending

भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या आयोजन सचिवपदी अनिल अमरोळे; बेळगावात सत्कार

बेलगाम प्राईड/ बेळगावच्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे अनिल अमरोळे यांची भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या आयोजन सचिवपदी (वर्किंग सेक्रेटरी) निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचा महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि मराठा समाजाचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

रमाकांत कोंडुसकर यांच्या कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात अमरोळे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. बेळगावच्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला युवा कार्यकर्ते सागर पाटील, युवा नेते प्रशांत भातखंडे, सूरज चव्हाण, दर्शन हदगल, राजेंद्र बैलूर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. अनिल अमरोळे यांच्या निवडीबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले आणि नव्या जबाबदारीत त्यांच्याकडून उल्लेखनीय कार्य घडावे, अशा शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!