Uncategorized
Trending

बेळगाव मर्चंट्स सोसायटीला 16.68 लाखांचा निव्वळ नफा -चेअरमन चौगुले

बेलगाम प्राईड /दि बेळगाव मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला सन 2024 -25 या अहवाल सालात 16 लाख 68 हजार 534 रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना शेकडा 10 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती सोसायटीचे चेअरमन नारायणराव चौगुले यांनी दिली.

अनुसुरकर गल्ली येथील दशभुजा गणेश मंदिर छत्रेवाडा सभागृहामध्ये दि बेळगाव मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच गेल्या शनिवारी खेळीमेळीत पार पडली. या सभेच्या अध्यक्ष स्थानावरून चेअरमन नारायण चौगुले बोलत होते. याप्रसंगी व्हाईस चेअरमन कुमुद भाटिया, शाखा चेअरमन नारायण किटवाडकर, ज्येष्ठ संचालक ॲड. अशोक बोळगुंडी, अशोक येळ्ळूरकर, महेश रायकर, शिवाजी चव्हाण, नितीन पवार, मिलिंद शिंदे, रेखा अत्तीमरद आणि सोसायटीचे जनरल मॅनेजर लक्ष्मीकांत मकवान व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी चेअरमन नारायण चौगुले यांच्या हस्ते श्री गणेश पूजन आणि त्यांच्यासह उपस्थित संचालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. चेअरमन चौगुले यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केल्यानंतर अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासद व हितचिंतकांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

सभेच्या प्रारंभी जनरल मॅनेजर मकवान यांनी मागील वर्षाच्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे, तसेच अहवाल आणि नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन केले. सभासदांनी सर्व ठरावांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. शाखा चेअरमन नारायण किटवाडकर यांनी सोसायटीच्या सांपत्तिक स्थितीची माहिती देताना सोसायटीचे भाग भांडवल 6891600 रुपये, ठेवी 350238907 रु., कर्ज वितरण 334822699 रु., गुंतवणूक 055868368 रु., खेळते भांडवल 404569050 रु. आणि वार्षिक उलाढाल 921073074 रुपये इतकी असल्याचे सांगितले. खास दसरा आणि दिवाळी सणासाठी आकर्षक 21 महिन्यासाठी मुदत ठेव योजना सुरू केली आहे. तिची मुदत 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत असून या सुवर्णसंधीचा लाभ ठेविदारांनी घ्यावा, असे आवाहनही नारायण किटवाडकर यांनी केले. त्यानंतर संचालक नितीन आप्पासाहेब पवार, प्रणय शेट्टी, ज्येष्ठ सभासद गुरुनाथ पाटील, भास्कर अंकलगी, रवी नाईक, सुनील हुक्केरीकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सभासदांनी उपस्थित केलेल्या शंका व प्रश्नांचे चेअरमन नारायण चौगुले व नारायण किटवाडकर यांनी समर्पक उत्तरे देऊन निरसन केले.

सर्वसाधारण सभेला सोसायटीचे सल्लागार अजित माने, संजय ओझा, अर्पणा नितीन पवार, सभासद उत्तम पाटील, डॉ. शिवाजी अनगोळकर, लक्ष्मण येळ्ळूरकर, दिलीप दोशी, मनोज परीट, धनराज जाधव, महांतेश देसाई, पापालाल ओझा, सतीश अत्तीमरद, प्रदीप वेर्णेकर, परमानंद अमाशी, सोसायटीचे वकील ॲड. मंजय्या शेट्टी, ॲड. उमेश यरदाळ, ॲड. शकुंतला जाधव, माजी नगरसेविका अनिता किटवाडकर, शारदा मकवान, शोभा शेखदार, अनिता पाटील आदींसह सोसायटीचे कर्मचारी आणि पिग्मी कलेक्टरांसह सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नारायण किटवाडकर यांनी केले, तर शेवटी संचालक अशोक बोळगुंडी यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!