Uncategorized
Trending

दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत राज्यातील क्रीडापटूंचे यश 

बेलगाम प्राईड/ भूतानमधील थिम्पू येथे झालेल्या १६ व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव चॅम्पियनशिप २०२६ मध्ये कर्नाटकच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांचे यश गाठले आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके जिंकून कर्नाटकाच्या विजयी मानाचा तुरा रोवला आहे.

या स्पर्धेत ७० किलो वजनी गटात ज्येष्ठ पुरुषांच्या शरीरसौष्ठव प्रकारात प्रताप कालकुंद्रीकर यांनी सुवर्णपदक पटकावले.८० किलो वजनी गटात प्रशांत खन्नुकर यांनी आणि ६५ किलो वजनी गटात ऋषभ वसिष्ठ यांनी रौप्यपदकावर आपले नाव कोरले आहे.तर महिलांच्या ॲथलेटिक फिजिक प्रकारात केतकी पाटील यांनी कांस्यपदक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

खेळाडूंच्या या यशाबद्दल कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉलीबिल्डर्सचे सदस्य कृतेश कावळे , नागराज कोळकर, गणेश गुंडोप, राजशेखर चव्हाण, अजित सिद्दन्नावर, सुनील राऊत, सुनील पवार, आकाश हुलीयार, गंगाधर एम आणि हेमंत हवाल यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!