Uncategorized
Trending

माळीहाळ पोलिसांची हातभट्टी दारू विक्रीवर कारवाई; एकाला अटक

बेलगाम प्राईड/माळीहाळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू विक्रीविरोधात कारवाई करून एका आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई १३ नोव्हेंबर २०२६ रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

माळीहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व त्यांच्या पथकाने अष्टे गावातील स्मशानभूमीजवळ सार्वजनिक ठिकाणी छापा टाकला. यावेळी नागाप्पा निंगाप्पा पुजेरी (रा. अष्टे, बेळगाव) हा स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या हातभट्टी दारूची विक्री करताना आढळून आला.

पोलिसांनी त्याच्याकडून दोन प्लास्टिक कॅनमध्ये भरलेली अंदाजे ७ लिटर हातभट्टी दारू जप्त केली. या दारूची किंमत सुमारे १ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी माळीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६३/२०२६ अन्वये कर्नाटक अबकारी कायदा १९६५ च्या कलम ३२ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई करून पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!