Uncategorized
Trending

काकती श्री सिद्धेश्वर देवस्थानचा भर यात्रोत्सव पुढील मंगळवारी 

बेलगाम प्राईड/ लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काकती येथील ग्रामदेवता श्री सिद्धेश्वर देवस्थानचा भर यात्रा कार्यक्रम येत्या मंगळवारी दिनांक २४ रोजी होणार आहे.

श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रोत्सवाला गुरुवार दिनांक १९ पासून गुढीपाडवा दिवशी गणपती पूजन,पंचांग पूजा, वाचन आदी कार्यक्रमांनी सुरुवात होईल.रविवार दिनांक २२ रोजी इंगळ्यांची ची लाकडे आणण्याचा कार्यक्रम होणार आहे.सोमवार दिनांक २3 रोजी सायंकाळी आंबिल गाडे तसेच रात्री शोभा गाडे होणार आहेत.

मंगळवार दिनांक २४ रोजी सायंकाळी भर यात्रा असून,मंदिरात पहाटेपासून धार्मिक विधी कार्यक्रम,भर यात्रा,सायंकाळी इंगळ्यांचा यांचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दिनांक २५ रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान होणार आहेत.भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान पंचमंडळाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!