Uncategorized
Trending

ओमकार कंग्राळकरची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदी निवड

कंग्राळकर कुटुंबाची दुसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज 

बेलगाम प्राईड/ बेळगाव येथील गणेशपूर ओमकार उर्फ गोपी प्रताप कंग्राळकर याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाली असून त्याच्या या यशाने संपूर्ण जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. एकाच कुटुंबातील सर्व सदस्य देशसेवेसाठी समर्पित असण्याचा दुर्मिळ बहुमान कंग्राळकर कुटुंबाला मिळाला आहे.

ओमकार हा माजी सैनिक प्रताप गोपाळ कंग्राळकर यांचा सुपुत्र आहे. विशेष म्हणजे ओमकारची बहीण अक्षता ही सध्या सीमा सुरक्षा दलात सेवा बजावत आहे. वडिलांनी सैन्य दलात प्रदीर्घ सेवा केल्यानंतर आता त्यांची दोन्ही मुले देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. ओमकारच्या या निवडीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“कंग्राळकर कुटुंब हे खऱ्या अर्थाने देशप्रेमी कुटुंब आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलगी बीएसएफमध्ये गेली आणि आता मुलगा भारतीय सैन्यात अधिकारी झाला आहे. संपूर्ण कुटुंबच देशसेवेसाठी अहोरात्र झटत आहे, ही बेळगावसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अशा शब्दांत त्यांनी ओमकारचे कौतुक केले.

भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून देशसेवा करण्याचे स्वप्न ओमकारने आपल्या जिद्दीच्या जोरावर पूर्ण केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत असून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!