Uncategorized
Trending

दहावी परीक्षेत मराठी विद्यानिकेतनचा निकाल ९४.७९ टक्के

स्नेहा हिरोजी ९८.४ टक्के गुणांसह शाळेत प्रथम

बेलगाम प्राईड : बेळगाव कॅम्प भागात असलेल्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी विद्यानिकेतन शाळेचा एसएसएलसी परीक्षेत ९४.७९ टक्के निकाल लागल्याने  यंदाही यशस्वीपणे जपले आहे.

शाळेची विद्यार्थिनी स्नेहा यल्लाप्पा हिरोजी हिने ६२५ पैकी ६१५ गुण मिळवून ९८.४ टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक पटकावला असून, तिने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शिवराज सिद्धेश्वर गवळी आणि उर्वी आनंद पाटील या दोघांनीही ६०७ गुण (९७.१२%) मिळवून शाळेत संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळवला, तर वैजनाथ शरद पाटील ६०६ गुणांसह (९६.९६%) तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.

गुणवत्ता यादीत सोहम हळदणकर (९६.८%), अनिकेत जाधव (९६.६४%), अनुष्का पाटील व श्रेया भातकांडे (९५.६८%), उदय कुमार हाजगोळकर (९५.३६%), ऐश्वर्या कंग्राळकर (९५.२%) आणि स्वरा पाटील (९४.४%) यांनी ९४ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. तर अदिती चोपडे आणि रघुवीर देसाई यांनी ९३.९२ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!